साधारणत: १९८९ चा काळ असावा. ऑक्झिलियम संस्थेच्या तात्कालिन सुपिरियर मा.सि. निकोलिना यांनी सावेडीत एक बंगला घेतला. त्यामध्ये २५-३० मुलांना घेऊन नर्सरी स्कुलला सुरुवात केली. २-३ वर्षातच त्या बंगल्या शेजारीच एक मोठी इमारत बघायला मिळाली. तिच आजची ऑक्झिलियम संस्था होय.
२५ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर गतकाळात मागे वळून पाहिले असता संस्थेच्या उभारणीमध्ये अनेक मा, सिस्टरांचा मोलाचा सहभाग आहे. त्यामध्ये अहमदनगर संस्थेच्या पहिल्या सुपिरियर मा. सि. निकोलिना यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यांचा संस्था उभारणीमध्ये सिंहाचा वाटा आहे. तसेच मा. सि. मागरिट मिस्किटा व मा. सि. मीना यांनीही संस्थेसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे व संस्था नावारूपाला आणली आहे. मा. सि. फ्लेव्ही यांनी भूतकाळात संस्था जोपासली आहे तर विद्यमान सुपिरियर मा. सि.ट्रिजा ह्या वर्तमानात संस्थेचा पदभार सांभाळत आहेत. जेव्हा सावेडी परिसरात ऑक्झिलियम संस्था उभारली गेली तेव्हा परिसराचा कायापालट व्हायला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. सावेडीत पूर्वी चर्च नव्हते. ऑक्झिलियम संस्थेच्या छोट्या चॅपल मध्ये रविवारी परिसरातील ख्रिस्ती बंधु-भगिनी चर्चला जाऊ लागले. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरातील ख्रिस्ती समाजाचा चर्चा प्रश्न तात्पुरता सुटला.
ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल ही अहमदनगर जिल्ह्यातील एक अग्रगण्य व शिस्तप्रिय शाळा म्हणून परिचित आहे. विद्यार्थी दररोज नेटकेपणाने शाळेला हजर राहतात.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शाळेच्या व्यवस्थापन विषेश लक्ष आहे. त्यादृष्टीने सतत प्रयत्नही आहेत. शाळेमध्ये सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा इ. कार्यक्रम वर्षभर असतात. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळाच्या शिक्षण प्रणालिचा अवलंब शाळेने केला आहे. पालक या नात्याने शाळेत जाण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्या प्रत्येक वेळी एक वेगळी , चांगली गोष्ट बघायला व अनुभवयास मिळाली. शाळेचा संपूर्ण स्टाफ उच्चशिक्षित आहे. त्यामुळे एसएससी बोर्डाचा निकाल दरवर्षी १००% असतो. एखादी संस्था तिच्या शिस्तप्रियतेमुळे प्रगतीपथावर वाटचाल करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑक्झिलियम संस्था होय. शाळेचे नियम व शिस्तप्रियता विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतात, अर्थात विद्यार्थी जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणतात. या गोष्टीचा त्यांना भावी आयुष्यात निश्चित फायदा होतो. आज देशात आणि परदेशात ऑक्झिलियम संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडविले आहे आनंदाची बाब आहे. दोन वर्षापूर्वी संस्थेने ज्युनिअर कॉल सुरू केले आहे.
शालेय शिक्षणाबरोबरच ऑक्झिलियम संस्थेने सामाजिक क्षेत्रातही आपले योगदान दिले आहे. समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना मदतीचा हात दिला आहे. खेड्यातील गरीब व होतकरू मुलींसाठी वसतीगृहाची व्यवस्था केली आहे. तसेच ऑक्झिलियम कम्युनिटी कॉलेज मध्ये मुलींना नर्सिगचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नामांकित हॉस्पिटल्समध्ये मुलींना नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच खेडेगावात रुग्णसेवाही केली जाते. महिलांचे बचत गट संस्थेच्या माध्यमातुन चालविले जातात. ग्रामीण भागात धर्मशिक्षणही दिले जाते. अशा प्रकारे ऑक्झिलियम संस्था समाजासाठी एक वरदानच ठरली आहे. समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देऊन संस्था समरस झाली आहे.
अहमदनगर आणून परिचित जर राहतात.व्यवस्थापनाचे न. शाळेमध्ये क्रिम वर्षभर ण प्रणालिचा त जाण्याची की , चांगली पूर्ण स्टाफ जल दरवर्षी तप्रियतेमुळे रण म्हणजे हे तर विद्यमान दभार सांभाळत संस्था उभारली ह्या वर्षी अहमदनगर ऑक्झिलियम संस्था आपल्या अर्थाने सुरुवात शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्याचा रौप्य स्थेच्या छोट्या भगिनी चर्चला तील ख्रिस्ती महोत्सव साजरा करीत आहे. त्यामुळे संपूर्ण "ऑक्झिलियम परिवाराचे" (व्यवस्थापनाचे, स्टाफचे व विद्यार्थ्यांचे) हार्दिक अभिनंदन व भावी कार्यासाठी अनेक शुभेच्छा...
लुकस पाटोळे संस्थापक-अध्यक्ष,
आधार सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान, एमआयडीसी, अहमदनगर.
Comments